Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनार्दन हरीजी महाराजांच्या अवतरण दिनानिमित्त विविध उपक्रम

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या बेचाळीसाव्या अवतरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अवतरण दिनाचे औचित्य साधून फैजपूर नगरीत विविध मान्यवरांनी व श्रद्धावानांनी महाराजांचे दर्शन घेऊन विविध उपक्रम राबविले. यात जळगाव येथील सराफ बाजारातील जिवलग मित्र ग्रुप यांनी स्वेटर देऊन महाराजांची तुला करून गरीब मुलांना महाराजांच्या हस्ते स्वेटर वाटण्यात आली. धनंजय कीर्तने यांनी उपस्थितांना २०० मास्क गुरुदेव सेवा आश्रम जामनेरचे श्याम चैतन्यजी महाराज यांनी आंबा व पारिजातकाचे रोप देऊन महाराजांचे अभिष्टचिंतन केले तर कलाविष्कार ग्रुप तर्फे आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील मुलांना चित्रकलेचे धडे दिले व त्यांना शैक्षणिक सहित्यासह बुंदीचे लाडू वाटप केले. अनेक बालकलाकारांनी महाराजांचे पेन्सिल तथा कलरने पेंटिंग काढून भेट म्हणून दिल्या.

आपल्या वाढदिवसानिमित्त महाराजांनी अनाथांची माता सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमाला अकरा हजार रुपये देणगी दिली. सतपंथ मंदिरात दिवसभरात येणार्‍यांची रीघ लागली होती. मात्र सोशल डिस्टन्सचे पालन करून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून मंदिरांमध्ये महाराजांच्या दर्शनासाठी एक-एकांना सोडण्यात येत होते. यावेळी संत सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्ती प्रकाशदासजी, शास्त्री भक्ती किशोर दासजी, परमपूज्य श्याम चैतन्य जी महाराज, खंडोबा देवस्थानातील राम मनोहरदास यांच्यासह आमदार शिरीष दादा चौधरी, प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, जिल्हा परिषद शिक्षण सभापती रवींद्र पाटील, डॉक्टर कुंदन फेगडे, डॉ. मिलिंद वायकोळे, नगराध्यक्षा महानंदा होले, नगरसेवक तथा गटनेते बापू वाघुळदे, पांडूरंग सराफ, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहते, नगरसेवक देवा साळी, देवेंद्र बेंडाळे, भुसावळचे नगरसेवक परिक्षित बर्‍हाटे, प्राचार्य व्ही. आर. पाटील, पंडित कोल्हे आदी मान्यवरांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला. अनेकांनी फोन व संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version