Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात योग दिनानिमित्त जनजागृती रॅली अन पथनाट्य

3101d7e3 0689 4cab b034 4dab34bbbce8

भुसावळ (प्रतिनिधी) येथे रेल्वेतर्फे विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित भारत स्काउट्स गाईड शिबिरात आज शुक्रवारी (दि.२१) दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता रेलवे स्कूलच्या प्रांगणात योगा प्राणायम तसेच हास्य योग करुन योग दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी योगा प्रशिक्षक डॉ. हरिनारायण त्रिपाठी (मध्य प्रदेश ), श्रीमती मधुमाला कौशल (छत्तीसगढ़ ), एन. बी. परदेशी यांनी योगा प्राणायाम करण्याची पध्यती आणि त्याचे लाभ समजावून त्यांची माहिती दिली. ताडासन, वुक्षासन, भुजंगासन, सर्वांगासन, हस्तासन यांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच मन्सुफ़ अली यांनी हास्य योगा करवून सर्वाना हास्यमुग्ध केले. या कार्यक्रमा प्रसंगी मंडल रेल प्रबंधक आर. के. यादव, अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे, मुख्य चिकित्सा अधिकारी पी. सामंतराय, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबधंक आर. के. शर्मा, वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता लक्ष्मी नारायण ,
वरिष्ठ मंडल गृह आणि पर्यावरण प्रबंधक रामचंद्रन, सर्व अधिकारी आणि भारत स्काउट्स गाईडसचे पदाधिकारी आणि विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.

भारत स्काउट्स गाईडच्या सहभागी स्काउट्स गाईड यांनी ध्वजारोहणानंतर विश्व योगा दिनानिमित्त जनजागृती रैली काढली. या रॅलीला वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे यांच्याहस्ते हिरवा झेंड़ा दाखवून शुभारंभ केला. ही रॅली स्काउट्स-गाईडस मैदान येथून सकाळी ९.३० वाजता निघाली,ती गांधी पुतळ्यापासून सातारा पुलाकडून रेलवे स्टेशनपर्यंत काढण्यात आली. रेलवे स्थानकाजवळ स्काउट्स-गाईडसमार्फ़त योगासनांचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. यानंतर ही रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सराफ बाजार, गांधी चौकमार्गे सातारा पुलाकडून मंडल रेल प्रबंधक कार्यालयाकडून रेलवे स्काउट्स-गाईडस मैदानावर येऊन समाप्त झाली.

Exit mobile version