Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) जनसंग्राम बहुजन लोकमंच ठेवीदार संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.आघाडीचे प्रणेते मा.खा.अँड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे आज जिल्हा दौऱ्यावर होते.त्यांची जनसंग्राम बहुजन संघटना,बारा बलुतेदार महासंघ व ओबीसी पदाधिकाऱ्यांनी सकाळी अजिंठा विश्रामगृहात भेट घेतली.

बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे,कार्याध्यक्ष किशोर सूर्यवंशी,ओबीसी सत्यशोधक परिषदेचे ईश्वर मोरे,परिट समाजाचे प्रदेश सदस्य अर्जुन मांडोळे,विभाग अध्यक्ष सुरेश ठाकरे,ज्येष्ठ विधिज्ञ राजेश झालटे यांनी अँड.प्रकाश आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर श्री.ठाकरे यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात आला.

भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने,ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे,जिल्हा निरीक्षक शरद वसतकर,भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे,एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान,महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार यांनी श्री.ठाकरे यांना प्रवेश दिला.

प्रवेशावेळी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारा बलुतेदार व बहुजन समाजाची मोट बांधणे व आपल्या न्याय हक्कापासून वंचित लोकांपर्यंत आघाडीचे धोरण पोहचविण्याची जबाबदारी विवेक ठाकरे यांच्यावर टाकण्यात येत असल्याचे यावेळी डॉ.दशरथ भांडे यांनी जाहीर केले.

नगरसेवक रियाज बागवान,हाजी युसूफ शेख,महानगराध्यक्ष गिरीष नेहते,महानगर महासचिव अभिजित रंधे,जिल्हा महासचिव गमीर शेख,संपर्क प्रमुख आधार कांबळे,युवा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत भालेराव,युवा महानगराध्यक्ष जितेंद्र केदार,शहर उपाध्यक्ष किरण वाघ,युवक महासचिव अनुप पानपाटील,जुबेर खान,सचिन अडकमोल,समीर शेख,माजी महानगराध्यक्ष दिपक बाविस्कर,भीमराव सोनवणे,रऊफ खान,समाधान सोनवणे, खालिद खाटीक,योगेश पाटील,राजू सपकाळे,देवा सोनवणे,ईश्वर ढिवरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version