Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाकडून जंगी स्वागत

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मराठा नेते जरांगे पाटील यांचे जामनेर शहरातील भुसावल चौफुलीवर सकल मराठा समाजातर्फे जंगी स्वागत करण्यात आला. वीस जेसीबीच्या साह्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधवांचा जनसागर या नागरी सत्कारासाठी उसळला होता.

यावेळी मराठा नेते जरांगे पाटील यांनी सरकारला इंटिमेशन दिले असून येत्या 24 डिसेंबरला मराठा समाजाला सरसकट आरक्षण शासनाने दिले पाहिजे, जर असे झाले नाही तर मराठा त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसून यावेळी जरांगे पाटील यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करीत सांगितले की महाजन यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की मराठा समाजातील कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेतले जाईल, मात्र आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळलेला नाही. त्याचबरोबर त्यांनी यावेळी बोलताना आमदार छगन भुजबळ यांच्यावर कडकडीत टीका केली.

Exit mobile version