जामनेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर  (व्हिडीओ)     

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने बाबाजी राघू मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा तर्फे जामनेर तालुक्यात सेवा सप्ताह पंधरवडा कार्यक्रम पार पडणार असून त्यामध्ये मोफत आरोग्य शिबिर स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर असे वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी जि. प. सदस्य अमित देशमुख, विलास पाटील, नगरपालिका उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नगरसेविका संध्या पाटील, शितल सोनवणे, ज्योती पाटील, लीना पाटील, नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, रवींद्र झाल्टे, दीपक तायडे, दीपक पाटील, पुखराज डांगी, कैलास पालवे, सुभाष पवार, मयूर पाटील, विनोद पाटील, डॉक्टर संजीव पाटील, नवल पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते आधी उपस्थित होते.

 

Protected Content