Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर तालुक्याला वादळाचा तडाखा : गिरीश महाजन यांनी केली पाहणी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यामध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे फत्तेपूर देऊळगाव कापूसवाडी पळासखेडा यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये चक्रीवादळ झाले यामुळे मोठ्या प्रमाणावर घराचे गोठ्याचे नुकसान झाले आहे.

काल सायंकाळपासून तालुक्यातील विविध गावांना वादळाचा फटका बसला. यात उडालेल्या पत्रामुळे जनावरे मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर शेती पिकाचे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतीचे घराचे व जनावरे जखमी झालेल्या व दगावलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

दरम्यान, जामनेर तालुक्यातील वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले असून तात्काळ पंचनामे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर नुकसान झालेल्या सर्व नागरिक व शेतकर्‍यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Exit mobile version