Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुटुंबाच्या मारहाणीत वृध्द महिलेचा मृत्यू; चौघांविरूध्द गुन्हा

जामनेर प्रतिनिधी । जुन्या वादातून वृध्द महिलेस केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे घडली असून या प्रकरणी चौघांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील लीलाबाई छगन तुरे (वय ७०) आणि विजय गणेश तेली यांचे घराच्या मागील भागात असलेल्या गटारीवरून पूर्वी वाद झाले होते. यातूनच गुरूवारी रात्री पुन्हा एकदा वाद झाले. यावेळी विजय गणेश तेली, त्याची पत्नी रेखा विजय तेली, मुलगा आकाश आणि हर्षल या चौघांनी लिलाबाईंना लाथाबुक्क्यांनी छाती, पोट व तोंडावर बेदम मारहाण केली. तसेच मुलगा भिका छगन तुरे (वय ३०) याला देखील तुझ्या आईप्रमाणे खून करण्याची धमकी दिली.

दरम्यान, चौघांनी केलेल्या मारहाणीत लिलाबाई छगन तुरे यांचा मृत्यू झाले. या प्रकरणी भिका तुरे याने पहूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार तेली कुटुंबातील चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यापैकी विजय गणेश तेली व आकाश तेली यांना अटक करण्यात आली. तर रेखा तेली व हर्षल तेली हे दोघे पसार झाले आहेत.

पुढील तपास डीवायएसपी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल खताळ, उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार अनिल सुरवाडे, ज्ञानेश्‍वर बाविस्कर हे करत आहेत.

Exit mobile version