Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी आमदार आबाजी नाना पाटील अनंतात विलीन

जामनेर jamner प्रतिनिधी । जामनेर मतदारसंघाची धुरा दोनदा सांभाळणारे माजी आमदार आबाजी नाना पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

जामनेरचे माजी आमदार तथा जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष आबाजी नाना पाटील (वय ९४, रा.शहापूर, ता.जामनेर) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. सन १९६१ ते १९७१ असे सलग दहा वर्षे ते आमदार होते. त्यांच्या अध्यक्षतेखालील जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीने अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य केले. या संस्थेचे ते सलग ४४ वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूने जामनेर तालुक्याच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. मान्यवरांसह सर्वसामान्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

Exit mobile version