Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा

जामनेर प्रतिनिधी | माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आ. गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर अलीकडे त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. या पार्श्‍वभूमिवर, त्यांनी चाचणी करून घेतली असता आज या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आ. गिरीश महाजन हे गेल्या अनेक दिवसांपासून बर्‍याच सार्वजनीक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. कालच त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेऊन यानंतर पत्रकारांशी संवाद देखील साधला होता. या पार्श्‍वभूमिवर, आपल्या संपर्कातल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून काळजी घ्यावी असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.

आज आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यात विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात येणार होते. हे कार्यक्रम आता रद्द करण्यात आले आहेत. तर गिरीशभाऊ हे आज सकाळपासून होम क्वॉरंटाईन झाले असल्याची माहिती त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.

Exit mobile version