Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर कृउबा समितीमधील मक्यावर गुरांनी मारला डल्ला (व्हिडीओ)

jamner news11

जामनेर प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर टाकलेला मकावर गुरांनी डल्ला मारला आहे. याप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अवारात मोठ्या प्रमाणावर मकाची आवाक आली आहे. यंदा पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. यात केळी, कापूस, उस, मका, ज्वारी, बाजरी याचा समावेश आहे. दरम्यान अतिपावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुकण्यासाठी ठेवलेले धान्याची अशी नाशधुस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अतिवृष्टीमुळे झालेले पिकांच्या नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही त्यातच दुष्काळात शेतकऱ्यांचा तेरावा महिना असे चित्र दिसून येत आहे.

Exit mobile version