Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर नगरपालिका पाणीपुरवठा सभापतीपदी अतिश झाल्टे

जामनेर प्रतिनिधी । जामनेर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापतीपदी अतिश झाल्टे तर दिवाबत्ती समिती सभापती बाबुराव हिवराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जामनेर नगरपालिकेच्या ठरल्याप्रमाणे आदींच्या विविध समस्या त्यावरील सभापती राजीनामा झाल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी जामनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी रोजी नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी नगरपालिकेच्या विविध समित्यांवरील सभापतीची निवड करण्यात आली. त्यामध्ये पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीपदी अतिश झाल्टे तर दिवाबत्ती विशेष समिती सभापतीपदी बाबुराव हिवराळे, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक समिती सभापतीपदी मनियार सुरय्याबी मुनाफ, नियोजन व विकास समिती सभापतीपदी शेख रशीद बाबी अमिनुद्दिन, महिला व बाल कल्याण सभापतीपदी शेख बतूलबी यासीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेला उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, नपा गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अरुण शेवाळे यांनी कामकाज पाहिले. सगळ्या नगरपालिकेच्या नवनियुक्त सभापती निवड झालेल्या सभापतींचा माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व भाजपा पदाधिकारी अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version