Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरातील रुग्णालयाची तोडफोड

जामनेर प्रतिनिधी । महिलेच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याच्या संशयावरून येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलची तोडफोड करण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, परवीन बी फिरोज खान ही महिला पोट दुखत असल्यामुळे सोमवारी साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. त्या ठिकाणी डॉ.सुरेश नाईक यांनी त्यांच्या तपासण्या केल्या. मागील डॉक्टरांच्या फाईलची पडताळणी करून त्यांच्यावर उपचार केले. मात्र महिलेचे प्रकृती न सुधरल्यामुळे परवीन बी यांना डॉ.रमेश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये तोडफोड केली. या प्रकरणी अद्याप पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version