Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…सीडी लावण्याचे काम अजून बाकी ! : खडसेंचा जामनेरात इशारा

जामनेर jamner प्रतिनिधी । मी ईडी लावल्यास सीडी लावल्याचे बोललो होतो…आता त्यांनी ईडी लावली तरी माझी सीडी लावण्याचे काम बाकी असल्याचा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला आहे. आ. महाजन यांच्या जामनेरात त्यांनी केलेले हे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

माजी मंत्री आ. गिरीश महाजन girish mahajan यांचा बालेकिल्ला असणार्‍या जामनेरात काल रात्री उशीरा राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात बोलतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे eknath khadse यांनी जोरदार टोलेबाजी केली. खडसे म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश घेताना माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असं मी गंमतीने म्हणालो होतो. जयंतराव मला म्हणाले, तुमच्या मागे ईडी लागली तर तेव्हा मी म्हणालो मग मी सीडी लावेल. पण खरंच माझ्या मागे ईडी लागली. त्यामुळे आपलं काम अजून बाकी आहे. त्यांनी ईडी लावली. आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे, असा इशारा खडसेंनी दिला.

”एकनाथराव खडसे यांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. मात्र त्यांनी आधी दिलेल्या इशार्‍याचे काय ?” अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती. यामुळे आता पुन्हा खडसे यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याचे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version