Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट शॉपींगचा व्यावसायिकाला मानसिक त्रास

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एका व्यावसायिकाच्या नावे बनावट शॉपींग करून त्याला मानसिक त्रास देण्याचा विचीत्र प्रकार समोर आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

जामनेर येथील ३५ वर्षाच्या तरूण व्यावसायिकाच्या घरी ऑनलाईन शॉपींग पोर्टलवरून एक पार्सल आले. ऑर्डर दिली नसतांनाही हे पार्सल आल्याने तो चक्रावून गेला. मात्र हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने पार्सल रिसीव्ह केले. यात महिलांचे अंतर्वस्त्र निघाले. यानंतर अनेक शॉपींग पोर्टल्सवरून अशाच प्रकारचे पार्सल्स येऊ लागल्याने त्या तरूणाला मोठा मानसिक त्रास झाला. सहा जूनपासून सुरू झालेला हा प्रकार अनेक दिवसांपर्यंत सुरू राहिला.

या प्रकरणी शेवटी संबंधीत तरूणाने जळगाव सायबर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या संदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे खोडसाळपणा करणार्‍याने सदर तरूणाचा बनावट ई-मेल तयार करून त्यावरून या व्यावसायिकाच्या पत्त्यावर ऑर्डर दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस स्थानकाचे निरिक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Exit mobile version