Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांच्या छेडखानीवरून जामनेरात दोन गट भिडले

जामनेर प्रतिनिधी । नदीवर धुणी, भांडी करणार्‍या महिलांसमोर तरूणांचा एक गट विवस्त्र पोहत असल्याचा धक्कादायक प्रकार जामनेरात घडला असून यावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

कांग नदीकाठीच्या ओझर गावातील महिला बांधाजवळ धुणी, भांडी करायला येतात. एका समुदायाचे काही तरूण गेल्या पाच ते सात दिवसांपासून याच बंधार्‍यातील पाण्यात पोहोण्यासाठी येतात. यापैकी काही तरूण विवस्त्र अवस्थेत पोहोत असतानाच छेड काढत असल्याचे काही तरुणींनी कुटुंबियांना सांगितले. शुक्रवारी याच टारगट तरूणांनी ओझर येथील तरुणींची छेड काढली. या वेळी महिलांनी गावातील तरूणांना हा प्रकार सांगितला. यावरून दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांची गाडी पाहून वाद घालणारे तरूण पसार झाले.

दरम्यान, पोहणार्‍या तरुणांनी तलवारी काढल्याची माहिती समोर आल्यानंतर एक जमाव पोलीस स्थानकात आला असता त्यांना सौम्य लाठीमार करून पांगविण्यात आले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत याबाबत जामनेर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Exit mobile version