Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात तरूणावर प्राणघातक हल्ला

जामनेर प्रतिनिधी | शहरातील जामनेरपुरा भागातील रहिवासी असलेल्या तरूणावर एका टोळक्याने रात्री प्राणघातक हल्ला केला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील जामनेरपुरा भागातील रहिवासी असणारा सचिन संतोष बोरसे हा तरूण भुसावळ रोडवर असणार्‍या आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी काल रात्री गेला होता. शेतात जाताच पाठीमागून कुणीतरी त्याच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. यानंतर पाच-सहा जणांनी त्याला विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आरडा-ओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले.

दरम्यान, सचिन बोरसे याने घायळ असतांनाही आपल्या मित्रांना या प्रकाराची माहिती दिली. यामुळे त्याच्या मित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याच्यावर जामनेरात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जखमीची विचारपूस करून हल्ल्याबाबत तपास सुरू केला आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version