Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंचायत समिती स्तरीय क्रीडा स्पर्धांचे पारितोषीक वितरण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समिती स्तरीय आयोजीत करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे पारितोषीक वितरण गटविकास अधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

येथे जि. प. कर्मचारी व शिक्षण विभागाच्या शिक्षक यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी राम लोहार, विस्तार अधिकारी रमेश दुसाने, विष्णू काळे, विजय सरोदे, केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, सुरेश अंभोरे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी दत्तात्रय धुंडाळे, भानुदास पाटील, बाबुराव जोंधळे, शुभांगी पाटील, संदीप पाटील, किरण पाटील, नवल राजपूत, विकास वराडे, प्रदीप जाधव, चंद्रकांत फिरके आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांनी गटशिक्षणाधिकारी म्हणाले की, शिक्षकांच्या अशाप्रकारे विविध स्पर्धा घ्या घेतल्यामुळे त्यांचाही कलागुणांना वाव मिळत असून त्यांनी हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे कारण शिक्षकांमधले वेगवेगळे गुन्हा मुळे विद्यार्थ्यांचे बौद्धिक व शारीरिक विकास होण्यास फायदा होईल. दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षक स्पर्धेमध्ये विविध खेळ खेळण्यात आले. त्यामध्ये गायन,वादन,नृत्य,बुद्धिबळ,बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट, खो-खो,कबड्डी, कॅरम,इत्यादी क्रीडा इत्यादी खेळाचे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजयी झालेल्यांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला. कार्यक्रमात विषय तज्ञ शिक्षक उपस्थित होते प्रस्तावना सलीम शेख सूत्रसंचालन संदीप पाटील तर आभार प्रदर्शन किरण पाटील यांनी केले.

Exit mobile version