Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक- जमियत

jamiyat meeting new delhi

नवी दिल्ली । जम्मू व काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक होता आणि पुढेदेखील राहणार असल्याच्या शब्दात आज जमियत उलेमा ए हिंद या मुस्लीम विद्वानांच्या संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली. यासोबत जमियतने पाकच्या इराद्यांना सुरूंग लावला आहे.

जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेची महत्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने जम्मू व काश्मिरमधील कलम-३७० हटविल्यानंतरच्या परिस्थितीबाबत संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली.

उलमा-ए-हिंदचे पदाधिकारी महमूद मदनी यांनी आपल्या भाषणातून काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहिल. भारताच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय असून काश्मिरींच्या शंका दूर करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांची आहे. आम्ही काश्मीर मुद्द्यावर भारताच्या सोबत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, काश्मीरप्रश्‍नी भारतीय मुसलमान भारताच्या विरोधात आहेत, असे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचांवर दाखवण्याचा प्रयत्न करीत असून आम्ही या प्रकाराची निंदा करत आहोत. जमियतने आज एक ठराव पारित केला असून यामध्ये काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. आम्ही आपल्या देशाची सुरक्षा आणि अखंडतेसोबत कोणतीही तडजोड करणार नाही. भारत आमचा देश आहे आणि आम्ही या देशासोबत उभे आहोत, असेही या ठरावात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती महमूद मदनी यांनी दिली. या बैठकीला जमियतचे देशभरातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version