Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वड्री धरणाचे आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते जलपुजन

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वड्री येथे धरणाचे आज रावेर-यावलचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्री धरण जलपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हरित क्रांतीचे जनक लोकसेवक राज्याचे माजी मंत्री स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने मान्यता मिळुन सुमारे ३० वर्षापुर्वी पुर्णत्वास आलेल्या वड्री धरणाचे जलपुजनाची संधी आपल्याला आयोजकांच्या माध्यमातुन मिळाली. याबद्दल आयोजकांचे आमदार शिरीष चौधरी यांनी धन्यवाद व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद गटनेते अप्पासाहेब सोनवणे, यावल पंचायत समिति सदस्य तथा गटनेते शेखर पाटील व युवानेते धनंजय चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, वड्रीचे सरपंच अजय भालेराव, दुलसिंग बारेला, हाजी शित्रु तडवी, अरमान तडवी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, काँग्रेसचे कदीर खान, आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष विलास, मासुम तडवी, वाढोदेचे सरपंच संदीप सोनवणे, प्रदेश काँग्रेस सेवा फ़ाउंडेशन तालुक़ाध्यक्ष अभय महाजन, काँग्रेसच्या फ़ाउंडेशनचे मीडिया प्रमुख विक्की पाटिल, माजी पोलीस पाटील गोविंदा सुरवाडे, रवी पाटील व इतर कॉग्रेसचे पदाधिकारी धीरज कुरकुरे, पद्माकर पाटिल, कोळवदचे प्रगतिशील शेतकरी चंदन महाजन, विकास पाटिल, रमेश पाटिल, महेंद्र धांडे, वैभव महाजन या सर्व शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वड्री धरण जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेस आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर परमान तडवी व अय्युब तडवी, युनुस तडवी यांच्यासह समस्त आदीवासी सेलच्या पदाधिकारी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

 

Exit mobile version