Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात सहाय्यक फौजदाराचा आकस्मात मृत्यू

Suresh patil

जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांचा रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्‍याची घटना घडली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार सुरेश रघुनाथ पाटील (वय-57) रा. चंदू अण्णा नगर, निमखेडी रोड जळगाव याना ड्युवटीवर असताना रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्यांना कर्तव्यावर असलेले सहकारी पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांना मयत घोषित केले.

हे गेल्या 3 वर्षांपासून शहर पोलिस ठाण्यात ऑनड्युटी होते. शुक्रवारी त्यांची संध्याकाळी ८ ते सकाळी ८ पर्यंतचे ड्युटी असताना रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला. त्यांना कर्तव्यावर असलेले सहकारी पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांना मयत घोषित केले. सहा.फौ.सुरेश पाटील यांचा काल वाढदिवस असल्याने ते रात्री ८ वा. ड्युटीवर आले असता पोलीस ठाण्याचे पी.आय.अरूण निकम व सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस आनंदात साजरा केला. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचारी आहे तर दुसरा मुलगा बँकेत नोकरीस आहे.

Exit mobile version