Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात उद्या लेवा गणबोली साहित्य संमेलनाबाबत बैठक

leva ganboli sahitya

जळगाव प्रतिनिधी । दुसर्‍या राज्यस्तरीय लेवा गणबोली साहित्य संमेलनाची नियोजनाबाबत उद्या 17 जानेवारी रोजी कवयित्री बहिणाबाई उद्यानात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाईंच्या काव्यात जी भाषा आहे, ती लेवा पाटीदारी अथवा लेवा गणबोली ही आहे. वेगळा गोडवा असलेली ही भाषा आहे. या भाषेतील साहित्य पुढील पिढीपर्यंत जावे, त्याचे संवर्धन व्हावे आणि ते अधिक समृद्ध व्हावे यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात येते.

या भाषेत साहित्य लिहिणारे साहित्यिक, कवी साहित्यप्रेमींना विनम्र आवाहन करण्यात येते की, या बैठकीला उपस्थित राहावे ..बैठकीत विविध विषयांवर महत्वाची चर्चा होणार आहे. विविध समिती गठन करण्याबाबतही चर्चा होईल. विशेष म्हणजे या महत्वपूर्ण बैठकीस मुंबई येथील जेष्ठ संशोधक, इतिहासकार आणि भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. नि. रा.पाटील खास उपस्थिती राहणार आहे . त्यांची गेल्या आठवड्यातच संमेलनाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

साहित्यिक, आणि प्रेमींनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन लेवा गणबोली साहित्य मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष व जेष्ठ लेखक डॉ. अरविंदजी नारखेडे आणि सचिव तुषार वाघुळदे, सहसचिव साहित्यिक व प्रसिद्ध जिल्हा व.वा.वाचनालयाचे संचालक तथा जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य, जेष्ठ लेखक डॉ.प्र.श्रा.चौधरी तसेच प्रा.संध्या महाजन, संजय पाटील, नेहा वाघुळदे, चित्रकार लिलाधर कोल्हे, वीणा नारखेडे, रश्मी पाटील, ज्योती राणे आदींनी केले आहे.

Exit mobile version