Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात बंद घर फोडले; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

Crime Photo

जळगाव प्रतिनिधी । अहमदनगर येथे मुलीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या दाम्पत्याचे बंद घर चोरट्यांनी फोडून रोकड व दागिणे असा 3 लाख 58 हजार 650 रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना समोर मंगळवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

महाबळ परिसरातील 24 ब, श्रीधर नगर येथे उदय प्रल्हाद थोरात (54) हे पत्नी अर्पणासह वास्तव्यास आहेत. ते जैन व्हॅली येथे नोकरी करतात. 05 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास थोरात दाम्पत्य घराच्या गेटला तसेच घराच्या दरवाजाला कुलूप लावून अहमदनगर येथे मुलीच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते. थोरात यांचेकडे दूध देण्यासाठी शालीक नावाचा दूधवाला आला असता, त्याला थोरात यांचे ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. हा प्रकार त्याने थोरात यांच्या शेजारील भिमसिंग राजपूत यांना सांगितला. राजपूत यांनी फोनवरुन थोरात यांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार थोरात यांनी मंगळवारी पहाटे जळगाव गाठले. घरी आल्यावर पाहणी केली असता, कपाटाचे दरवाजे उघडे, व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर थोरात यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. थोरात यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली.

असा गेला मुद्देमाल
1 लाख 1 हजार 250 रूपये किंमतीची 40.5 ग्रॅम वजनाच्या अकरा सोन्याच्या बांगड्या, 1, लाख 2 हजार रूपये किमंतीची 40.8 ग्रॅम वजनाच्या एकूण नऊ सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याचा गोफ, 7 हजार 750 रू. किंमतीचे 3.1 ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातील कर्नफुल, 12 हजाराचे 500 रू. किंमतीचे 05 ग्रॅम वजनाची 01 सोन्याची चैन, 59 हजार 500 रूपये किंमतीचे 23.8 ग्रॅम वजनाचे एकूण 02 सोन्याचे मंनीमंगळसुत्र ,24 हजार 750 रूपये किंमतीचे 9.9 ग्रॅम वजनाचा 01 सोन्याचा नेकलेस , 6,250 रूपये किंमतीचे 2.05 ग्रॅम वजनाची 01 सोन्याची कानातील रिंग, 5 हजार 150 रुपये किमतीचे 51.5 ग्रॅम वजनाचे 01 जोड चांदीचे पैजण , 02 रोख दोन हजार रूपये असा सुमारे एकूण 03 लाख 58 हजार 650 रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.

Exit mobile version