Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा उत्साहात

KCE News

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिम्मित कान्हा ललित कला केंद्र स्वरदा संगीत विभाग आयोजित स्वर्गीय तेजस नाईक स्मृतिप्रीत्यर्थ “तेज गंधर्व” राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धचे यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, परीक्षक ज्ञानेश्वर कासार, डॉ. आशिष रानडे, सुवर्णा नाईक, नितीन नाईक मंचावर उपस्थित होते.

के.सी.ई.सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जे शापित गंधर्व असतात ते पृथ्वीतलावर येतात आणि पृथ्वीतलावर आपल्या कलागुणांनी इथे मनोरंजन करतात आणि त्यांचा शापाचा कालावधी संपल्यानंतर ते आपल्याला सोडून जातात तसेच “नाम गुम जायेगा, चेहरा बदल जायेगा, मेरी आवाज हि पेहचान है” या गाण्याप्रमाणे तेजस आपल्यात आज नसला तरी येथे आलेल्या स्पर्धाकातून तो आपल्याला भेटेल असं भावपूर्ण वर्णन तेजसबद्दल श्री. वडोदकर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कपिल शिंगाणे यांनी केले त्यांनी शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजीत करण्याची भूमिका मांडली. सुवर्णा नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तेजसच्या आठवणींना उजाळा देत जेठा महाविद्यालयाशी त्याचा असलेला स्नेह आणि तेजस जाण्यापूर्वी मुळजी जेठा महाविद्यालयात आयोजित समर्पण सोहळ्यात त्याने यमन गायन हे त्याचे शेवटचे गायन या गोष्टीना उजाळा देण्यासाठी व येथे आलेल्या स्पर्धाकातून त्याची भेट होईल असे नमूद केले.

यावेळी डॉ. उदय कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मूळजी जेठा महाविद्यालय स्वायत्तता स्वीकारताना आपल्याकडे आलेला विद्यार्थी हा एका कलाप्रकारात तसंच क्रीडा क्षेत्रात व त्यासोबतच त्याने घेतलेल्या अभ्यासक्रमात नैपुण्य प्राप्त झाला पाहिजे असे उद्दिष्ट ठेवलेले आहे कारण कला आयुष्यात एकटे पाडत नाही. कला जगण्याचे बळ देते असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत बालगटात २० व मोठ्या गटात १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इशा वडोदकर यांनी मानले.

Exit mobile version