Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात तिघांकडून तरूणाला बेदम मारहाण

Crime 1

जळगाव प्रतिनधी । शहरातील शिवाजी नगर हुडको येथे एकाला तीन अज्ञात तरूणांनी काहीही कारण नसतांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सोहिल खान लतील खान (वय-16) रा. गेंदालाल मिल, परीसर हा अल्पवयीन मुलगा मित्रांना भेटण्यासाठी शिवाजीनगर हुडको येथे भेटण्यासाठी रात्री 9 वाजता घरातून गेला. रात्री 10.30 वाजता घरी परत जात असतांना रस्त्यावर अज्ञात तिघांना बोलावून काहीही कारण नसतांना बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तिघे घटनास्थळाहून पसार झाले होते. तिघांविरोधात शहर पोलीसात मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version