Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावच्या पुष्पलता बेंडाळे चौकातून दुचाकी लांबवली

bike thief

 

जळगाव प्रतिनिधी | शहरातील पुष्पलता बेंडाळे चौका लगत असलेल्या पार्किंगमधून एक दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटा दुचाकी चोरून नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

संजय पांडुरंग जाधव (वय 26 ओमकार नगर अपारमेंट पटेल नगर, टेलीफोन नगरच्या बाजूला) हे काही कामानिमित्त 17 ऑगस्ट रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास कोंबडी बाजाराच्या पुढील चौफुलीवर असलेल्या बालाजी ॲग्रो दुकानासमोर आपली दुचाकी लावून कामानिमित्त निघून गेले. 18 ऑगस्ट रोजी रात्री1 वाजून 15 मिनिटांनी पुन्हा लावलेला पार्किंगच्या ठिकाणी गाडी घेण्यासाठी आले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. इतरत्र शोधाशोध केली. परंतू दुचाकी मिळून आली नाही. या संदर्भात आज जिल्हापेठ पोलिसात दुचाकी चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुचाकी चोर हा दुचाकी चोरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे.

Exit mobile version