Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावकरांनी घेतले योगाचे धडे !; एकता पतसंस्थेतर्फे आयोजन

ekata ratail news

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या 15 वर्षांपासून योगाभ्यासाचे प्रशिक्षण देत असलेले सुप्रसिद्ध योगशिक्षक सुनील गुरव यांच्या ‘निःशुल्क योग मार्गदर्शन कार्यशाळेचे’ आयोजन नवीपेठ येथील एकता रिटेल किराणा मर्चंट सहकारी पतपेढी जळगावतर्फे नुकतेच करण्यात आले होते.

एकता हॉलमध्ये सकाळी 8 ते 9 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत योगशिक्षक सुनील गुरव यांनी दैनंदिन जीवनात योगासने व प्राणायामाचे महत्त्व समजावून सांगितले. योगपुर्वक हालचाली, काही सोपे व महत्त्वाची आसने तसेच जलद श्वसन, भस्त्रीका, कपालभाती, अनुलोम-विलोम प्राणायाम यांचे फायदे सांगुन प्रात्याक्षिके करून दाखविली. यावेळी सर्व उपस्थितांना निरोगी व आनंदी जीवन कसे जगावे यासंदर्भात मार्गदर्शन करीत त्यांच्याकडून आसने करून घेण्यात आली. शेवटी हास्यप्रयोग घेऊन कार्यशाळा संपली. कार्यशाळेसाठी सहयोगशिक्षक सुभाष तळेले यांनी सहकार्य केले.

एकता पतसंस्थेतर्फे आज नोट मेला
एकता रिटेल किराणा मर्चंट सहकारी पतपेढी जळगावतर्फे उद्या दि.26 रोजी सकाळी 11 वाजता एकता पतसंस्थेचा एकता हॉल याठिकाणी नोट मेला आयोजित करण्यात आला आहे. नोट मेळ्यात 20 रूपयांच्या नवीन कोर्‍या नोटांचे वितरण करण्यात येणार आहे. जळगावकरांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी पतसंस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन एकता पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास अडवानी, पतसंस्थेच्या सीईओ प्रणिता कोलते यांनी केले आहे.

Exit mobile version