Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात तरूणीवर अत्याचार; संशयिताला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरूणीवर लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्ती अत्याचार केला व पैश्यांची मागणी करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक समोर आला आहे. याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील २० वर्षीय तरूणी ही जळगाव येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत राहते. दरम्यान तिची ओळख विशाल राजेश तडवी याच्याशी झाला. दोघांची ओळख निर्माण झाल्याने दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. दरम्यान २८ ऑक्टोबर २०१८ पासून तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तरूणीकडून पैश्यांची मागणी करू लागला. पैसे दिले नाही तर शिवीगाळ करून मारहाण केली. याला कंटाळून तरूणीने थेट रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून संशयित आरोपी विशाल तडवी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल राजेश तडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Exit mobile version