Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात तरूणाची ९६ हजाराची ऑनलाईन फसवणूक; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । घर भाड्याने घ्यायचे असल्याचे भासवून पेटीएमच्या माध्यमातून जळगावातील तरूणाची ९६ हजारात फसवणूक झाल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मयूर देवेंद्र चौधरी (वय-२६) ,रा.टेलीफोन नगर, जळगाव याचे अमरावती शहरात त्याचे स्वत:चे घर असल्याने मॅजिकब्रिक्स या वेबसाईटवर ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्यावरुन ५ जून रोजी रणदीपसिंग नाव सांगून एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला व मी आर्मीत जम्मू काश्मिरला नोकरीला असून अमरावती युनीटला बदली झालेली आहे. त्यामुळे मला तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे असे सांगितले. संबंधित व्यक्तीने चौधरीकडे पेटीएम क्रमांक मागितला असता त्यानेही तो दिला.

मयुर चौधरी याला ११ जून रोजी रात्री ८ वाजता संबंधित व्यक्तीचा फोन आला व १ रुपयाचा क्युआर कोड पाठवितो व तो तुम्ही पेटीएमवर स्कॅन करा त्यानंतर माझा एक रुपया व तुमचा एक रुपया परत येईल असे असे तो म्हणाला. त्यानुसार दोन रुपये मयुरच्या खात्यावर आले. त्यानंतर संबंधिताने मयुरला परत क्युआर कोड पाठविला. या क्यूआरकोडच्या सहाय्याने मयुरच्या पेटीएमवरुन १५ हजार ९९९ रुपये असे तीन वेळा व एक वेळा १८ हजार रुपये पाठविले. अशा पध्दतीने एकूण ९५ हजार ९९६ रुपये मयुरच्याच पेटीएमवरुन संबंधित व्यक्तीला पाठविण्यात आल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे उघडकीला आल्यानंतर मयूरने रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version