Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. ३ नाव्हेंबर रोजी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान सुयश लोढा आणि ओम लाठी (पुर्ण नाव माहित नाही) यांनी मुलीला तिच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेल्याचा घटना उघडकीला आली. मुलीच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता मुलगी कुठेच आढळून आली नाही. मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुयश लोढा आणि ओम लाठी यांनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय शिरसाठ करीत आहे.

Exit mobile version