Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वे धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

death

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ते शिरसोली रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने पिंप्राळा हुडको येथील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे.

जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दिलेली माहिती अशी की, सागर मधुकर सोनार (वय-२२, रा. सिद्धार्थ नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) हा आपल्या परिवारासह जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील सिद्धार्थ नगरात वास्तव्याला होता. शुक्रवार २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. खिशातील कागदपत्राच्या आधारे मयताची ओळख पटली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सायकर करीत आहेत.

Exit mobile version