Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निरिक्षकांमुळेच आंदोलनात सहभागी झालो : निलंबीत एसटी कर्मचार्‍यांचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी | एरंडोल येथील वाहतूक निरिक्षक जी. डी. बागूल यांच्यामुळेच आपण एसटीच्या आंदोलनात सहभागी झाल्याने आमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे निवेदन अकरा कर्मचार्‍यांनी विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना दिले आहे.

या संदर्भात वृत्त असे की, संपात सहभागी झाल्यामुळे एरंडोल आगाराचे ११ कर्मचारी निलंबित आहेत. या कामबंद आंदोलनात सहभागासाठी वाहतूक निरीक्षक जी. डी. बागुल यांनी प्रोत्साहित केल्याने आंदोलनात सहभागी झालो. मात्र, आज ते स्वत:च तक्रारदार होऊन आमचे निलंबन घडवून आणत आहे. अशा चुकीच्या तक्रारीवरून झालेले निलंबन रद्द करण्यात येऊन चुकीची तक्रार देणारे वाहतूक निरीक्षक बागुल यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निलंबित कर्मचार्‍यांनी विभाग नियंत्रक जगनोर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जी. डी. बागुल हे सुरुवातीपासून कामबंद आंदोलनात सहभागी होते. १३ नोव्हेंबरच्या कामबंद आंदोलनात त्यांनीच सर्व कामगारांना शेवटपर्यंत आंदोलनात सहभागाची शपथ दिली होती असे या निवेदनात म्हटले आहे. यामुळे बागूल यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

या वेळी सर्व निलंबित कर्मचारी देविदास महाजन, अर्जुन पाटील, राकेश बडगुजर, उमेश सोनवणे, संदीप पाटील, ईश्वर पाटील, दशरथ महाजन, लीना महाले, छाया माळी, मनीषा पाटील, राजेश सरोदे उपस्थित होते.

Exit mobile version