Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ज्येष्ठ समाजवादी नेते शेखर सोनाळकर कालवश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ज्येष्ठ समाजवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा ख्यातनाम सनदी लेखापाल (सीए) शेखर सोनाळकर Shekhar Sonalkar Jalgaon यांनी आज पहाटे शेवटचा श्‍वास घेतला.

( Image Credit Source : Live Trends News )

आज पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास शेखर सोनाळकर यांचे निधन झाले, ते ७२ वर्षांचे होते. सत्तरच्या दशकातील लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जडण-घडण झालेले शेखर सोनाळकर यांनी आणीबाणीत कारावास देखील भोगला. वासंती दिघे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. यानंतर गेल्या सुमारे चार दशकांपासून जास्त काळ हे दाम्पत्य राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत होते.

शेखर सोनाळकर यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ढासळली होती. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. जळगावातील अनेक चळवळींच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या हिताचे काम केले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजचा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून जळगावच्या समाजजीवनातील एक तळपता तारा काळाच्या पडद्याआड गेला आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे त्यांना आदरांजली.

Exit mobile version