Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले : दोन युवक ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराजवळच्या दूरदर्शन टॉवरजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविल्याने जळगावातील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगावातील परवेज निसार खाटीक (वय २२, लक्ष्मीनगर, जळगाव ) आणि आमीर जाकीर खाटीक (वय २२, उस्मानिया पार्क ) हे भुसावळ येथे कामानिमित्त गेले होते. आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज हा जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या आमीर याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असतांना त्याने शेवटचा श्‍वास घेतला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दोन्ही तरूणांच्या आप्तांनी जिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली. आप्तांच्या आक्रोशाने वातावरण गंभीर बनले असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. तर या तरूणांच्या दुचाकीने उडविल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

Exit mobile version