Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे भव्य रिक्षा रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर जयंती निमीत्त वीर सावरकर रिक्षा युनियन मार्फत आज शहरातून भव्य रिक्षा रॅली काढण्यात आली.

स्वातंत्रवीर सावरकर जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अर्जुन भंगाळे आणि आयोजक तथा जिल्हाध्यक्ष वीर सावरकर रिक्षा युनियन दिलीपभाऊ सपकाळे हे होते. तर प्रमुख पाहुणे लिलाधर कानडे जळगाव शहर वाहतूक निरीक्षक, नवनीत वळवी आणि ऋषिकेश महाले सहाय्यक परिवहन अधिकारी , ऍड. विजय काबरा यांनी मार्गदर्शन केले व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

प्रमुख उपस्तिथी मध्ये एस.एच.महाजन आणि दिलीप पाटील पोलीस प्रतिनिधी, रमेश पहलानी संगीत ग्रुप चे संचालक हे होते. जळगाव शहरातील सर्व नागरिक, रिक्षा चालक-मालक ,स्कुल व्हन,स्कुल बस चालक-मालक आणी कुटूंबातील सर्व लहान थोर सदस्य कार्यक्रमांस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्टेट बँक चौक, ला ना शाळा, जळगांव येथून झेंडा दाखवून रॅलीस सुरवात झाली. सदर रिक्षा फेरी ही स्टेट बँक चौक येथून कोर्ट मार्गे ,नेहरू चौक ,टॉवर चौक,जुने बस स्टॅण्ड ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून नवीन बस स्टॅण्ड मार्गे ,स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्या जवळ रैलीची सांगता सय्यद् मुज़फ्फर् अलि वाहतूक परीक्षक वाहतूक शाखा यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यकमाचे सूत्रसंचालन विनोद सपकाळे आणि आभार वाल्मिक सपकाळे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी वीर सावरकर रिक्षा युनियन चे विलास ठाकूर,पोपट भोपळे,एकनाथ भारत, भारत बारी,योगेश धनगर,रफीक पिंजारी,महेंद्र ठाकूर,शशिकांत जाधव,भारत राणे, ज्ञानेश्वर सोनवणे, चंदू पोलीस, कैलास पोलीस, सुरेश मोरे, नरेंद्र पांडे ,प्रमोद चौधरी, रमेश सोनार, सय्यद रहमान अली, रहीम सत्तार, सादिक शेख, दीपक पाटील, महिंद्रा ठाकूर, उत्तम पाटील ,जयंत जोशी ,शेख सय्यद, प्रभाकर महाजन ,सुरेश सोनवणे, भास्कर ठाकूर, विजय भंगाळे, संजय ठाकूर, वासुदेव लाडवंजारी, शेख मनियार ,मकसूद हुसेन, दिलीप चौधरी, मनोहर चौधरी, कैलास वानखेडे, विलास पोलीस, कैलास पोलीस, राजू पाटील विजय महाजन, शांताराम पवार, लक्ष्मण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर घुगे ,सौरभ नाचने ,नरेंद्र चौधरी, सुरेश पवार ,जितेंद्र आंबेकर ,वसंत महाजन, भास्कर शिरसाळे, चंद्रशेखर भावसार, शेख सादिक, योगेश धनगर, योगेश सांगळे, मनोहर भोंगे सुखदेव नाथबाबा, प्रकाश पाटील ,किशोर जावळे, शेख शकील, मंगेश कुवर, संभाजी पाटील, संजय महाजन, केशव पवार ,स्वप्निल पवार, दिलीप सोनवणे, भगवान पाटील ,अनिल बिराडे, अशोक महाजन, किरण मराठे, भगवान पाटील, अनिल शिंगटे, संजय निकम ,भगवान गुप्ता ,बाळू बडगुजर ,मनोहर महाजन, दिनेश पाटील ,गजानन जाधव, विश्वास बिर्‍हाडे,आदिनी परिश्रम घेतले.

Exit mobile version