Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी विद्यापीठाकडून मिळणार जागा !

जळगाव प्रतिनिधी | पाळधी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून दोन एकर जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्देश जारी केलेत. यासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

ग्रामपंचायत पाळधी बु. ता. धरणगाव जिल्हा जळगावकरिता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता उंच पाण्याची टाकी व फिल्टर प्लॉट उभारण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ताब्यातील मौजे पाळधी बु ता. धरणगाव येथील २ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भातील कार्यवाही जलदगतीने होण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळे आता पाळधी येथील पाणी पुरवठा योजना मार्गी लाणार आहे.

ग्रामपंचायत पाळधी बु. ता. धरणगाव जिल्हा जळगावकरिता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता उंच पाण्याची टाकी व फिल्टर प्लॉट उभारण्याबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रभारी कुलगुरू ई. वायू नंदन, सुभाष भुजबळ, शिवशंकर निकम यावेळी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, ग्रामपंचायत पाळधी बु. ता. धरणगाव जिल्हा जळगावकरिता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता उंच पाण्याची टाकी व फिल्टर प्लॉट उभारण्यासाठी विद्यापीठाच्या ताब्यातील मौजे पाळधी बु ता. धरणगाव येथे २ एकर जमिन गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी याठिकाणी उंच पाण्याची टाकी उभी करण्यात येणार असून या योजनेमुळे विद्यापिठाला आणि गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी लागणारी दोन एकर जागा विद्यापीठाने उपलब्ध करुन द्यावी. ही जमीन विद्यापिठाच्या नावावर असणार आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तातडीने कुलगुरुंकडे पाठवावा. यामध्ये जमिनीचा सर्वे नंबर देवून दोन एकर जागेचा उल्लेख करण्यात यावा. विद्यापिठाने यावर तातडीने कार्यवाही करुन एनओसी उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही श्री.सामंत यांनी दिले.

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले, येथील गावातील लोकांनी विद्यापिठाला जमिनी उपलब्ध करुन दिल्या आहे. नळ पाणी योजना सर्वांसाठी आहे. या योजनेमुळे येथील गावाला व विद्यापीठाला पाणी मिळणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version