Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. उन्मेषदादा पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

खासदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, एकीकडे खासदार पाटील हे दौर्‍याच्या नियोजनात असतांनाच त्यांचे @UnmeshPatilBjp हे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

खासदार उन्मेष पाटील हे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. मात्र दुपारपासून त्यांच्या अकाऊंटचा ताबा हा हॅकर्सनी घेतल्याचे दिसून येत आहे. या अकाऊंटवर SamuelCardillo.eth – RTFKT
यांचा ताबा असून विशेष म्हणजे ते व्हेरिफाईड असल्याचे दर्शविण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भात खासदार उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Exit mobile version