Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात तीन ठिकाणी घरफोडीतील अल्पवयीन मुलास अटक

jail

जळगाव प्रतिनिधी । वेगवेगळ्या तीन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना यापुर्वी मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीस आज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याला 16 तारखेपर्यंत बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, राकेश गुलाबराव पाटील रा. मोहाडी रोड, यांचे 29 सप्टेंबर 2019 रोजी, रत्ना संजय मालपुरे रा. गायत्री नगर यांचे 19 जुलै 2019 रोजी आणि दिपक शरदचंद्र चव्हाण रा. विनोबा नगर मोहाडी फाटा यांचे 29 सप्टेंबर रोजी यांच्या वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी आरोपी गुरूजितसिंग सुजाणसिंग बावरी रा. सदगुरू कॉलनी आणि मोनुसिंग जगदीशसिंग बावरी रा. शिरसोली यांनी यापुर्वी यांना या तिनही गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यातील 17 वर्षीय अल्पवयीन सह आरोपीस आज एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार आंनदसिंग पाटील यांनी अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 16 नोव्हेंबर पर्यंत बालसुधारगृह कोठडी देण्यात आली आहे.

Exit mobile version