Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव तालुका तलाठी संघाचे तहसीलसमोर धरणे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । ई फेरफार व ई चावडी प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल अर्वाच्च भाषा वापरून अपमान केला आहे. याच्या विरोधात जळगाव तालुका तलाठी संघाच्या वतीने बळीराम पेठेतील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की,  ई-फेरफार, ई-चावडी व ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संघटना पदाधिकारी यांच्याबद्दल अर्वाच्च व आक्षेपार्ह विधान केले. जगताप यांनी  केलेल्या विधानाबद्दल तलाठी महासंघाने निषेध व्यक्त केला. असून त्यांची तातडीने बदली करण्यात. दोन दिवसात बदली न झाल्यास १३ ऑक्टोबर पासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  याच्या निषेधार्थ आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी तलाठी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आला आहे. अनुषंगाने आज शहरातील बळीराम पेठेतील तहसील कार्यालयासमोर जळगाव तालुका तलाठी संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या निवेदनावर जळगाव तालुका तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष शशिकांत नेरकर, कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, रुपेश ठाकूर, रामेश्वर जाधव, वीरेंद्र पालवे, के. आर. सरोदे, राजकला पायघट, अनिता झाल्टे, मनीषा माने, चंद्रकांत पिंगे, रवींद्र घुले, ज्ञानेश्वर माळी, रमेश वंजारी, ए.यु. आंधळे, प्रज्ञाराणी वंजारे, मृणाली सोनवणे, सारिका दुरगडे, नितीश व्याळे, अनिरुद्ध खेतमलीस, भरत ननवरे, चंद्रकांत गंगावणे, संदीप भाडंगे, छाया कोळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version