पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे बोरखेड्यात ठाण मांडून ! : संशयित ताब्यात

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांचे हत्याकांड झाल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे घटनास्थळी ठाण मांडून असून रात्रीपर्यंत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रावेर नजिक बोरखेडा शेतीशिवार आदिवासी चार भावंडाच्या हत्याकांडाने जिल्हा हादरला असतांना युवा आयपीएस पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी हे प्रकरण अतिशय संयमाने हाताळत पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरस घटना ताजी असतांना रावेर तालुक्यात बोरखेड़ा शिवारमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला ही घटना आज सकाळी पोलिस प्रशासनाला कळताच पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी क्षणाचा विलंब न करता सकाळी दहाच्या आधी घटनास्थळ गाठल होते घटना वार्‍यासारखी तालुक्यात पसरत होती म्हणून घटनास्थळी लोकांची गर्दी जमत होती.पोलिस गर्दी पांगवत असतांना यात स्वत: एसपी डॉ. मुंडे यांनी सर्व कायदा-सुव्यवस्था सांभाळत लोकांना समजून सांगत होते. त्यांनी सामाजिक व राजकीय दृष्टया तसेच मिडिया कोणालाच रोखुन धरले नाही. प्रत्येकाला पीडीतांची विचारपूस करू दिली. त्यामुळे बाहेरुन आलेले प्रत्येक लोकप्रतिनिधी, पुढारी वा सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकारांना या प्रकरणाची माहिती मिळाली.

दरम्यान, डॉ मुंढे यांनी आपल्या सहकारी अप्पर अधिक्षक चंद्रकांत गवळी, आयपीएस कुमार चिंथा, डिवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या सह बाकी अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. ते स्वत: रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी ठाण मांडून बसल्याचे दिसून आले आहे. तर पाच संशयितांना ताब्यात घेतल्यामुळे आता या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content