Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव एकाच्या हातातून मोबाईल हिसकावून तिघे दुचाकीने पसार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर असलेल्या चांडक हॉस्पीटलसमोरून एकाच्या हातातील ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संतोष तुकाराम धाडी (वय-४८) रा. लोणवाडी ता.‍िज. जळगाव हे बस चालक आहेत. लोणवाडी येथे ते  आपल्या कुटुंबियांसह राहतात. २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ते चांडक हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या कन्स्ट्रक्शन समोरून पायी जात असतांना त्यांच्या मागून दुचाकीने अज्ञात तीन भामटे आले, त्यांच्या हातातील ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. यावेळी तिघांनी तोंडाला मास्क लावलेला होता. याप्रकरणी संतोष धाडी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.

Exit mobile version