Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावच्या साहित्यिकांनी भरवला भुतानमध्ये साहित्य महोत्सव!

Bhutan news sahityik news

जळगाव, प्रतिनिधी । येथील हिन्दी साहित्य गंगा संस्था जळगावद्वारा संचलित अमृतधारा फाऊंडेशनतर्फे नुकतेच भुतान येथील फुन्सुलिनमध्ये आंतरराष्ट्रीय अमृतधारा साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन देशातील संस्कार, भाषा, आचार-विचार यांचा साहित्याच्या माध्यमातून मेळ घालण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदी साहित्य गंगा संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.प्रियंका सोनी, विराज सोनी यांनी दोन्ही देशांच्या साहित्याचा मेळ घालण्यासाठी ७ दिवसीय महोत्सव भुटान येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे महावाणिज्य दूत आशिष मिध्धा, नटवर चौकसी, डॉ.सुषमा सिंह, सुमन चौधरी, डॉ.सुधाकर अदीब, किशोर श्रीवास्तव, शिवशंकर अवस्थी, डॉ.संजू श्रीश्रीमाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

महोत्सवाच्या दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षा डॉ.चेतना उपाध्याय तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मंजुळादास, मुकेश नादान, डॉ.सुधारानी सिंह, आरती झा, डॉ.गीता सराफ, डॉ.किर्तीवर्धन यांची उपस्थिती होती. हिन्दी आंतरराष्ट्रीय स्वरूप, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांची प्रासंगिकता, हिन्दी साहित्यातील कालबाह्य रचना आणि रचनाकार यावर त्यात चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी कवी सम्मेलन देखील घेण्यात आले.

महोत्सवाच्या तिसर्‍या सत्रात पुरस्कार वितरण दोन सत्रात पार पडले. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेशचंद्र नौगरेया होते. प्रमुख अतिथी म्हणून नटवरलाल चौकसी, रीटा भल्ला, डॉ.प्रबोध बसंल, डॉ.रमेशपाल सिंह, सुशील तिवारी, मिना गुप्ता, पूनम तिवारी यांची उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.प्रियंका सोनी, सूत्रसंचालन सुशील तिवारी, किशोर श्रीवास्तव, सुमन चौधरी, मुकेश नादान यांनी केले.

५५ साहित्यिकांचा गौरव
महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते ५५ साहित्यिक, रचनाकार आणि समाजसेवकांचा गौरव करण्यात आला. त्यात देशभरातील साहित्यिक आणि समाजसेवकांचा सहभाग होता. पुरस्कार सन्मान समारंभाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष मुकेश अग्रवाल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माला गुप्ता, निवेदिता श्रीवास्तव, कुंती हरिराम, घनश्याम श्रीवास्तव, डॉ.शशी सिंह, त्रिलोकचंद, डॉ.अशोक चौधरी होते.

५ पुस्तकांचे प्रकाशन
महोत्सवात डॉ.ममता नौगरैया लिखित नरेंद्र मोदी : सही नियत सही विकास, शहीद ए कारगील, माला गुप्ता लिखीत नदी को बहने दो, निबंध संग्रह खोलो द्वार सफलता के, सुमन चौधरी लिखीत काव्य संग्रह काश तुम आसमां होते याचे प्रकाशन करण्यात आले.

Exit mobile version