Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शॉकींग : बच्छाव यांच्या निवासस्थानी दरोड्याचा प्रयत्न-परिसरात खळबळ

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| शहरातील रिंगरोड अजय कॉलनीतील रहिवासी तथा वाहनक्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असलेल्या किरण बच्छाव यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवला. पिस्तुल लावून बच्छाव दाम्पत्यास लूटण्याच्या प्रयत्नात असतांनाच आरडाओरड झाल्याने दरोडेखोरांनी पोबारा केला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील रिंगरोड येथील अजय कॉलनीत सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक किरण बच्छाव कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. आज रात्री आठ वाजेच्या सुमारास किरण बच्छाव पत्नी व मुलाचे जेवण अटोपल्यावर सौ.बच्छाव स्वयंपाक घरात असतांना नऊ वाजेच्या सुमारास घराच्या मुख्यदाराची बेल वाजली.सौ.बच्छाव यांनी दार उघडताच दोन तरुणांनी कुत्रा फिरवायला गेलेले तुमचे वॉचमन काका रस्त्यावर चक्कर येवुन पडले असल्याचे सांगितले. यानंतर सौ. बच्छाव यांनी दार उघडताच हातात पिस्तूल, चाकूसारख्या शस्त्रासह तोंडावर मास्क लावलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी एकामागून एक घरात प्रवेश केला.किरण यांना पिस्तूल लावून हातपाय बांधत असतांनाच अचानक आरडा ओरड झाल्याने दरोडेखोरांनी घरातून पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती पेालिसांना दिल्यावर उपविभागीय पोलिस अधीकारी संदिप गावीत यांच्यासह गुन्हेशाखा, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पेालिस ठाण्याचा फौजफाटा बच्छाव यांच्या घरी धडकला. परिसराची पहाणी करत असतांना दरोडेखोर पळून गेलेल्या रस्त्याने एका ठिकाणी बॅग मिळून आली असून त्यात मिरची पुड, दोर्‍या आणि दरोड्याचे साहित्य हतोडी, स्क्रु ड्रायवर मिळून आले . रात्री उशिरा पर्यंत पोलिस या प्रकरणी तपास करत होते.

Exit mobile version