यावलहुन शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नागरिकांना इतक्या कमी वेळात बोरावल टाकरखेडा मार्ग जळगाव येथे जाण्यासाठी सोयीचा असलेला शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प आता जलसंपदा विभागाच्या आदेशाने सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या शेळगाव बॅरेज या महत्वकांशी मध्यम प्रकल्पाचे काम जवळपास अंतीम पहोचले असुन, प्रकल्पाचे मुख्यकाम पुर्ण झाले असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात नागरीकांसाठी बोरावल टाकरखेडा व शेळगाव मार्ग जळगावसाठी तयार करण्यात आलेल्या वाहतुकीसाठीचा कच्चा रस्ता काल दिनांक १३ जुनपासुन बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून पुर सदृ:श परिस्थितीमुळे प्रकल्पात साचणारे पाणी या मुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

नागरीकांनी व वाहनधारकांनी कुठल्याही कारणास्तव तापी नदीच्या पात्रातुन जाण्याचा प्रयत्न करू नये व संभाव्य दुर्घटना टाळावी असे आवाहन जलसंपदा विभाग, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प जळगावच्या वतीने करण्यात आले आहे .

Protected Content