Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात रिक्षाची चोरी; शहर पोलीसात गुन्हा

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । प्रवाश्यांना सुटे पैसे आणण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचीच रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी शहरातील दत्त डेअरी जवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मोहम्मद हुमायू मोहम्मद सईद वय-53 रा. रजा कॉलनी मेहरूण जवळ हे रिक्षा चालविण्याचे काम करतात. 12 रोजी शहरातील दत्त डेअरीजवळ सोडण्यासाठी काही प्रवाश्यांना रिक्षा क्रमांक (एमएच 19 व्ही 1013)मध्ये बसविले होते. त्यानंतर दत्त डेअरीजवळ आल्यानंतर प्रवश्यांनी सुटे पैसे न देता नोट दिली. त्याचे सुटे घेण्यासाठी हुमायू हे काही अंतरावर असलेल्या दुकानावर गेले. तोवर अज्ञात चोरट्याने रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version