जळगावात कुंटणखाना उद्ध्वस्त; दोघे ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको रस्त्यावर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना गजाआड केले आहे. रामानंदनगर पोलिसांनी काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली असून रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळा हद्दीत असलेल्या हुडको रस्त्यावर महादेव मंदीराजवळ कुंटणखाना सुरु असल्याची गुप्त माहिती पो.नि.अनिल बडगुजर यांना समजली होती. या अनुषंगाने पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने एक पंटर कुंटणखान्यावर पाठविला. त्याने तेथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मोबाईलवरून देताच पोलिस पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकला. ही कारवाई रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

या छाप्यात संबंधीत कुंटणखाना दयावान बैरागी व त्याची बहिण मिळून चालवत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला स.पो.नि.संदीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ३, ४, ५, ७(१)(ब) अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दयावान बैरागी आणि दलाल जयेश अग्रवाल (चोपडा) यांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content