Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील पब्लिक स्कूलची आर्यन पार्क येथील सहल उत्साहात

jalgaon 3

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिपल्स बॅक व रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित जळगाव पब्लिक स्कूलमधील सिनिअर केजी या वर्गाची सहल नुकतीच आर्यन पार्क येथे नेण्यात आली होती.

या सहलीत एकूण 48 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सहलीत आर्यन पार्क येथील पुरातन वस्तू संग्रहालयाला भेट दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी उद्यानातील सर्व खेळणींचा आनंद घेतला. निसर्गरम्य अशा वातावरणात विद्यार्थ्यांना सहलीचा मनसोक्त आनंद घेतला. सहल यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या सहलीला सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

Exit mobile version