Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महात्मा फुले मार्केटमध्ये ‘हॉकर्समुक्त’ उपक्रम – पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाऊन उघडल्यानंतर दोन दिवसांपासून फुले मार्केटसह इतर मार्केटमध्ये हॉकर्सधारकांनी मोठी गर्दी केली आहे. महानगरपालिका आणि पोलीस पथकाच्या मदतीने ‘हॉकर्स मुक्त मार्केट’ करण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिली. 

 

महानगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे ‘हॉकर्स मुक्त मार्केट’ मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी फुले मार्केटमध्ये पाहणी केली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी  लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना  सांगितले की, पोलीस व मनपा प्रशासनातर्फे फुले मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या जागेवर मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करणे याची पाहणी करण्यात आली.  मार्केटमध्ये पार्किंगची व्यवस्था केल्याने  रस्त्यावर वाहतुकीचा व गर्दीचा प्रश्न निर्माण होणार नाही. यातून कोरोना काळात वाहतुकीचा प्रश्न, नागरिकांची सोय या सर्व गोष्टी यातून साध्य होतांना दिसत असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी मांडले. यापाहणी प्रसंगी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, शहर पोलीस स्टेशनचे धनंजय येरोले आदी उपस्थित होते. तसेच यावेळी नो पार्किन झोनमध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकी देखील जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

 

 

 

 

Exit mobile version