जळगाव वृध्दाच्या हातातील २४ हजाराची सोन्याची अंगठी जबरी लांबविली; एमआयडीसी पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळ अज्ञात तीन व्यक्तीने ७१ वर्षीय वयोवृध्दाच्या हातातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरी हिसकावून पसार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कांतीलाल मिश्रीलाल जैन (वय-७१) रा. पंचमुखी हनुमान मंदिरा मागे रणछोड नगर, आपल्या कुटुंबीयांसह राहतात आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मेडिकलवर गोळ्या घेण्यासाठी आणि सिंधी कॉलनीत भाजीपाला घेण्यासाठी ते घराबाहेर निघाले. शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील मेडिकल दुकानावरून त्यांनी गोळ्या घेतल्या त्यानंतर तेथून सिंधी कॉलनी येथे भाजीपाला घेवून परत रिक्षाने पद्मावती मंगल कार्यालयाजवळ ११ वाजता रिक्षातून उतरले. त्यावेळेस घराकडे पायी जात असताना मागून अज्ञात व्यक्तीने उजवा हात पकडून बाबा थांबा असे सांगितले. त्यानंतर अजून दोन जण दुचाकीवर आले त्यांनी हातातील ८ ग्रॅम वजनाची २४ हजार रुपये किमतीची अंगठी बळजबरी काढून तिघे भामटे दुचाकीवरून पसार झाले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली परंतू मदतीला कुणीच धावले नाही. याप्रकरणी कांतीलाल जैन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमाडिसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content