Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रभाग क्रमांक १० मध्ये डांबरीकरणास सुरूवात

जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या विशेष पुढाकाराने शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील गट क्रमांक १७४च्या परिसरात आजपासून डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील बर्‍याचशा भागांमध्ये अमृत योजनेमुळे रस्त्यांची खराब अवस्था झालेली आहे. तर आता काही भागांमध्ये अमृत योजनेचे काम पूर्णत्वाकडे आल्याने तेथील रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील गट क्रमांक १७४ या भागात देखील अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यामुळे या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नांनी नागरी दलीत वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेले हे काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होणार असून यामुळे या परिसरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

आज महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांमध्ये नगरसेवक शफी शेख, सुरेश सोनवणे, जाकीर पठाण, अभियंता मिलींद जगताप, अजय देशमुख, अतुल बारी, दीपक पवार, नितीन पाटील, नीरज राजपूत, पंकज पाटील, योगराज पाटील, स्वप्नील पाटील, चेतन बारी, शुभम सोनवणे, धनराज गोसावी, निलेश गोसावी यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Exit mobile version