Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले असून याबाबत सायबर खात्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे https://twitter.com/gulabraojipatil अधिकृत ट्विटर अकाऊंट असून यावरून ते नेहमी ट्विट करत असतात. हे अकाऊंट व्हेरीफाईड देखील आहे. मात्र गेल्या काही तासांपासून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे त्यांच्या अकाऊंटची आधी सर्वांसाठी खुली असणारी टाईमलाईन ही प्रोटेक्टेड करण्यात आली आहे. यामुळे अर्थातच कुणीही आता त्यांची टाईमलाईन पाहू शकत नाही. यासोबत त्यांच्या प्रोफाईल पीकवरील ना. गुलाबराव पाटील gulabrao patil यांचा फोटो चेंज करण्यात आलेला आहे. त्यांच्या जागी दुसर्‍याचाच फोटो टाकण्यात आलेला आहे.

ना. गुलाबराव पाटील यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अद्याप तरी कोणतेही संशयास्पद ट्विट करण्यात आलेले नाही. तथापि, सावधगिरीचा उपाय म्हणून याबाबत सायबर खात्याकडे तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. जळगाव सायबर शाखेत रमण मोहन अढळकर (रा. आदर्शनगर, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे. Twitter Account Of Minister Gulabrao Patil Hacked

Exit mobile version